धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या डेक्कन येथील स्मारकाचे नूतनीकरण भूमिपूजन समारंभ संपन्न

पुणे : पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील भव्य अश्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे नूतनीकरण भूमिपूजन समारंभ आज दि १४ मे २०२६ रोजी धर्मवीर संभाजी महाराजांच्या ३६९ व्या जयंती निमित पार पाडला. या स्मारकाचे नूतनीकरण होणार असून त्याचे भूमिपूजन मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री, सहकार, नागरी विमान वाहतूक, भारत सरकार यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने सकाळी शंभु महाराजांचा जन्मोत्सव सोहळा (पाळणा) साजरा करण्यात आला. तसेच पुण्यातील इतिहास संशोधकांचा व नित्यपूजा करणाऱ्या संस्थांचा  यावेळी प्रतिष्ठान मार्फत सन्मान करण्यात आला.

यावेळी महापौर मंजुषा नागपुरे उपस्थित होत्या त्या म्हणाल्या “येत्या एक वर्षात ह्या स्मारकाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्याचा पुणे महानगरपालिके चा प्रयत्न असेल.”

प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर म्हणाले, “ह्या स्मारका मार्फत संभाजी महाराजांचे कार्य, चरित्र आणि विचार आपल्याला आणखी दूर पोहोचवायचे आहेत.”

यावेळी मा.उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थानिक मा.आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, मा.स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसेवक राघवेंद्र मानकर, अपूर्व खाडे, अमृता म्हेत्रे, सुनिल पांडे, निवेदिता एकबोटे, अल्पना वरपे, पृथ्वीराज सुतार, विशाल धनावडे, धीरज घाटे, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, नारायण गलांडे, तेजश्री पवळे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री नवल किशोर राम, मा. पदाधिकारी, पुणे महानगरपालिके चे उपायुक्त व स्थानिक नागरिक व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी केले.

See also  विघ्नहर्ता नागरी सह पतसंस्था आणि मॉर्निंग ग्रूप पाषाण यांच्या संयुक्त विद्यमाने  इयत्ता १० आणि १२ च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन