प्रसिद्ध उद्योजक कै. नारायणराव पाषाणकर यांचे निधन

पाषाण : प्रसिद्ध वीट कारखानदार व ट्रान्सपोर्ट व्यावसायिक कै. नारायणराव दगडोबा पाषाणकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पाषाण परिसरासह सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कै. नारायणराव पाषाणकर यांच्या पश्चात पत्नी श्रीमती महानंदा नारायणराव पाषाणकर, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे नातू शुभम आणि उत्कर्ष हे उच्च शिक्षणासाठी परदेशात वास्तव्यास आहेत.ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. संतोष पाषाणकर यांचे वडील होत. आपल्या कष्टाळू, मनमिळाऊ व सामाजिक स्वभावामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. वीट उद्योग आणि वाहतूक व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला.

त्यांच्या निधनामुळे पाषाणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

See also  सकारात्मक उर्जानिर्मितीसाठी योगविद्या आत्मसात करा-डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार