वसुंधरा अभियान बाणेर संस्थेच्या माध्यमातून 300 झाडे लावून पर्यावरण दिन साजरा

बाणेर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ,वसुंधरा बाणेर संस्थे च्या माध्यमातून, तूकाई टेकडी येथे 5 जून रोजी सकाळी दोन तासात 300 झाडे लावण्यात आली.

गेल्या काही वर्षांमध्ये होत असलेल्या वातावरणबदलाचा परिणाम म्हणून ,असमान तापमान बदल  होत असून, गेल्या महिन्याभरापासून 40 डिग्री सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागत आहे, यामध्ये निश्चितच मानवाच्या भौतिक स्वार्थामुळे, निसर्गाची जी हानी झाली आहे, ते एक फार मोठे कारण आहे. यावर उपाय म्हणून वसुंधरा अभियान माध्यमातून फार मोठा नाही, पण एक छोटा प्रयत्न गेल्या वीस वर्षापासून वृक्षारोपणाच्या माध्यमातून वसुंधरा अभियान तर्फे चालू आहे.2006 पासून उजाड, ओसाड असलेल्या टेकडीवर  55 हजार पेक्षा जास्त झाडांचे जैववैविध्य युक्त देशी जंगल तयार केलेले आहे.

प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण करून पुढील सात वर्षे त्या झाडांची काळजी घेतली जाते.. वृक्षारोपणा चा केवळ कार्यक्रम न करता संवर्धनावर काम केले जात आहे आणि केवळ वृक्षारोपणच नाही तर जलसंवर्धन म्हणजेच, पाणी आडवा~ पाणी जिरवा वर देखील झाडांच्या माध्यमातून काम केले जाते. सलग समतल सर व लहान-मोठे बंधारे निर्मितीमुळे लाखो लिटर पाणी आज टेकडीवरच जिरवले जाऊन पाण्याचा जलसाठा वाढवण्यास मदत होत आहे. आजच्या या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चे महत्त्व जाणून, जवळपास 260  सदस्यांच्या उपस्थितीत यावर्षीच्या वृक्षारोपण मोहिमेस सुरुवात करण्यात आली.

पुढील तीन ते चार महिने वसुंधरा वृक्षारोपण मोहीम चालू ठेवून, वसुंधरांने नामकरण केलेल्या सह्याद्री भागामध्ये 5000 झाडांचे वृक्षारोपण उद्दिष्ट या पावसाळ्यात ठेवले आहे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून सभोवतालच्या पर्यावरण प्रेमींना  वृक्षारोपण करण्यास आवाहन करण्यात आले..

See also  स्नेहांकुर द रे होप या सामाजिक संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य वह्या वाटप