पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील पीटी -३ फॉर्म भरलेल्या मिळकत धारकांना 40% सवलतीसह सुधारित बिले देण्यात यावीत अशी मागणी माजी नगरसेवक शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी लेखी पत्राद्वारे कर आकारणी व कर संकलन उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडे केली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने मिळकत धारकांना 40 टक्के मिळकत करा मध्ये सवलत देण्यात येत होती. ही सवलत घेण्यासाठी पीटी -३ फॉर्म भरून घेण्यात आले होते. त्याप्रमाणे लाखो पुणेकरांनी हे फॉर्म भरून दिले. परंतु कर आकारणी व कर संकलन विभागाने या फॉर्मची शहानिशा केली नाही. यामुळे सन 2025 -26 च्या मिळकत करा मध्ये मिळकतकर धारकांना 40 टक्के सवलत न देता बिले देण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेने पुणे करांवर हा अन्याय केला असून याबाबत बिलांमध्ये सुधारणा करण्यात यावी व सुधारित बिले पुन्हा पाठवण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.
तसेच प्रत्येक क्षत्रिय कार्यालयामध्ये एक कक्ष सुरू करून तातडीने दुरुस्ती बिले देण्यासाठी सुरुवात करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी पृथ्वीराज सुतार यांनी पत्राद्वारे दिला आहे.