ओंजळ ग्रुप तर्फे शबरी वस्ती भागातील संगणक प्रशिक्षणार्थी मुला-मुलींना यांना स्कूल बॅग व शालेय साहित्याचे वाटप

बाणेर : हिंदु साम्राज दिनाचे औचित्य साधूनओंजळ ग्रुपचे श्री.रवीजी काबरा व फ्रेंडस ऑफ ट्रायबल सोसायटी चे श्री.अशोकजी नवाल यांच्या सौजन्याने श्री भगवती मंदीर सभागृहात स्कुल बॅग व शालेय उपयोगी साहित्याचे वाटप झाले.त्यात ७७ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला.

भारतमाता व छत्रपती  शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन चैतन्य गायन कट्याचे श्री. प्रदीपरावजी देशपांडे यांच्या शुभहस्ते झाले व कार्यक्रमाची सुरुवात झाली.नंतर ज्येष्ठ संघ स्वयंसेवक श्री.अरविंदजी तथा आप्पा वळसंगकरानी शिवरायां चे चरित्राचे विचार मुलांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. तर श्री.रमेशजी करमरकर यांनी प्रासंगिक काव्य गाऊन दाखवले.समाज सेवक व कार्यक्रमा चे आश्रयदाते श्री.अशोकजी नवाल यांनी संगणक ज्ञानाचे भावी जीवनातील महत्व व हिंदु साम्राज्य दिनाची पार्श्वभूमी व्यक्त केली.या कार्यक्रमात शबरी वस्ती मधील संगणक प्रशिक्षणार्थींना स्कुल बॅग व शालेय साहित्याचे वाटप  केले.

यानंतर फ्रेंडस ऑफ ट्रायबल सोसायटी तर्फे सर्वश्री गिरीधर राठी,डॉ.श्याम कुलकर्णी, प्रकाशदादा बोकील, विकासराव जोशी यांच्या कार्या चा गौरव संस्थ्येचे स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बाबुराव गेणूजी बालवडकर मनपा शाळेचे शिष्यवृती परीक्षा गूणत्ताधारक प्रिया इंगळे व पुरुषोत्तम इंगळे यांचा मार्गदर्शिका प्रा.सूपर्णाताई सरदेसाई यांच्या शूभास्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी चैतन्य गायन कटा प्रमुख प्रदीप देशपांडे, श्री व सौ.शास्त्री, कटकधोंड, डॉ. निखारे, प्रा.सुपर्णा सरदेसाई, शंखश्री चंद्रकांत जाधव पाटील, व्यंकट अय्यर, खांडसकर, श्रीरंग कुर्हे, उत्तमलाल रामधनीकाका, सुरेश चांडक,ओमजी चांडक, से.नि.पो.अधिकारी देशमुख व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

See also  शिवरायांची वाघनखे, जगदंब तलवार परत करण्याबाबत ब्रिटीश उपउच्चायुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद