राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार बाप्पू डाकले बहुजनांचा हिंदुत्ववादी चेहरा म्हणून कोथरूडच्या रिंगणात उभे

कोथरूड : कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्ष चे पदाधिकारी विजय बापू डाकले यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चौरंगी झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

कोथरूड विधानसभा मतदार संघामधून प्रामुख्याने भाजपाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मनसेचे किशोर शिंदे हे निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या तारखेपर्यंत विजय बापू डाकले आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असे वर्तवले जात होते. परंतु डाकले यांनी उमेदवारी अर्ज भरताना बहुजनांचे प्रतिनिधित्व म्हणून हजारोंच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला होता.

कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये भाजपाची ताकद अधिक असल्याचे वर्तवले जात आहे. या मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध भाजपा अशी लढत होत असल्याचे चर्चेत पाहायला मिळत आहे. यामध्ये सुमारे सव्वा दोन लाख हून अधिक बहुजन समाजाचे मतदार असून या मतदारांचे प्रतिनिधित्व म्हणून बाप्पू डाकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रथमच वंचित घटकांचा प्रतिनिधी उभा राहत असल्याने या वर्गामध्ये अधिक उत्साह कोथरूड मतदारसंघात पाहायला मिळत आहे. डाकले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हा उत्साह अनेकांनी पाहिल्याने अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. ब्राह्मण व मराठा मतदारांचे प्राबल्य कोथरूड मतदार संघात असले तरी तितकेच ओबीसी व मागासवर्गीय मतदार कोथरूड मतदार संघात असल्याने ही लढत कोथरूड मतदार संघाचे नवे चित्र निर्माण करणारी ठरणार का हे यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे.

विजय बाप्पू डाकले म्हणाले, मी हिंदुत्वासाठी काम केलेला कार्यकर्ता आहे. अनेक केसेस मी माझ्या अंगावर घेतल्या आहेत. तसेच कोथरूड करांमधील सर्व सामान्य मिसळणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. यामुळे बहुजन समाज माझ्या पाठीशी राहील व कोथरूड मध्ये नवी राजकीय समीकरणे उदयाला येतील असे सध्याचे चित्र आहे.

See also  महिला दिनानिमित्त यश ताम्हाणे यांच्या वतीने बाणेर परिसरातील 8 महिलांना मोफत कॉम्पुटर क्लास ची सोय