मालमत्तेसाठी मृत आईचेच बनवले बनावट मृत्युपत्र! वकिलासह ३ जणांवर बाणेर पोलिसांत गुन्हा दाखल, जाब विचारणाऱ्या बहिणीला दिली रस्त्यावर आणण्याची धमकी

पुणे : बाणेर भागातील तलाठी कार्यालयाच्या हद्दीत एका मृत महिलेच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी तिच्याच मुलांनी आणि एका वकिलाने मिळून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी मृत आईच्या नावाचे खोटे नोटराईझ्ड मृत्युपत्र तयार केले आणि त्यावर तिच्या बनावट स्वाक्षऱ्या करून मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा व ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ३२ वर्षीय विवाहित बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून बाणेर पोलीस ठाण्यात दोन नातेवाईकांसह एका वकिलाविरुद्ध फसवणूक, बनावटगिरी आणि धमकावल्याप्रकरणी विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २९ एप्रिल २०२६ पूर्वी घडला.

कैलास आटोळे, निलिमा आटोळे, ॲड. सुधीर मधुर निरफारके अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी नेहा प्रसाद मानकर (वय ३२, रा. वीरभद्रनगर, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२), ३१९(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३५२, ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

See also  जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा मुळशी येथे संपन्न: प्रथम क्रमांक मोरया कबड्डी संघ लवळे, द्वितीय क्रमांक भैरवनाथ संस्था संघ भोसरीने पटकाविला