‘वामा वुमन्स क्लब’ चा शुभारंभ सोहळा संपन्न

बाणेर : ‘वामा वुमन्स क्लब’ चा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी पुनम विधाते,  माजी नगरसेविका सुषमाताई निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, ज्येष्ठ प्राध्यापक सुनीता पाडाळे, ज्योती बालवडकर, समाजसेविका नीता जावळकर, पत्रकार शितल बर्गे यांनी दीप प्रज्वलन करत ‘वामा वूमेन्स क्लबचे’ अनावरण केले.

पुनम विधाते म्हणाल्या, खरंतर ‘वामा वुमन्स क्लब’ हा ग्रुप स्त्री शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी, तिच्यातील स्व: ची ओळख निर्माण करून देण्यासाठी सुरू केलेली छोटीशी सुरुवात पण, आज या कार्यक्रमाला तब्बल ७०० महिलांनी उपस्थित राहत हा केवळ एक महिलांचा ग्रुप नसून एक ‘महिलांची चळवळ’ आहे असे दाखवून दिले.जमलेल्या माझ्या सर्व माता-भगिनींना माझ्या स्त्री सक्षमीकरणाच्या या प्रयत्नाला दिलेल्या प्रोत्साहनासाठी सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, कान, नाक, घसा तज्ञ व बाणेर, बालेवाडी डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. कविता चौधरी, बँक ऑफ बडोदा च्या वरिष्ठ व्यवस्थापिका वृषाली दरडे यांनी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन केले.जमलेल्या सर्व महिलांना वामा वुमन्स क्लब ची आठवण म्हणून कॉफी मगचे वाटप करण्यात आले.

सर्व महिलांनी कार्यक्रमाच्या शेवटी गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरत मनसोक्त आनंद साजरा केला. तेजस्विनी भाले तसेच शोभा श्रीकांत यांनी देखील कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन केले, वत्सला शर्मा यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

See also  बालेवाडी लक्ष्मी माता चौक येथे रस्त्यावरील खड्ड्यात टँकरचे चाक अडकल्याने वाहतूक कोंडी