नगरसेवक अमोल बालवडकर यांची बाणेरमधील नाल्याची पाहणी; तातडीने साफसफाईचे आदेश

पुणे, प्रतिनिधी : बाणेर परिसरातील कॉन्कर्ड प्रॉक्सिमा व रेजेन्सी कॉसमॉस सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या नाल्याची नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. या परिसरातील नागरिकांना नाल्यात साचलेला गाळ, वाढलेली दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी निदर्शनास आले.

नागरिकांच्या तक्रारीनंतर बालवडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांकडून नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष पाहणीदरम्यान वस्तुस्थिती वेगळी असल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उद्यापासून तातडीने नाल्याची साफसफाई सुरू करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेशी संबंधित कोणत्याही प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. नाल्याची संपूर्ण स्वच्छता करून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली.

यावेळी कॉन्कर्ड प्रॉक्सिमा व रेजेन्सी कॉसमॉस सोसायटीतील सभासद, पुणे महानगरपालिका ड्रेनेज विभागाचे अभियंता श्री. प्रफुल्ल भाटकर तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते.

See also  औंध येथील ट्राफिक व अतिक्रमण विषयासंदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्त  व मनपा अधिकारी नागरिकांची संयुक्त बैठक