बालेवाडी | प्रतिनिधी : बालेवाडी येथील अष्टविनायक मित्र मंडळाला माजी केंद्रीय मंत्री तथा माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी भेट देत गणरायाची मनोभावे आरती केली. यावेळी नगरसेवक व स्थायी समिती सदस्य अमोल बालवडकर यांनी रावसाहेब दानवे पाटील यांचे स्वागत केले.
गणेशोत्सवानिमित्त बालेवाडी येथे आलेल्या रावसाहेब दानवे पाटील यांनी मंडळातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच उपस्थितांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. त्यांच्या आगमनामुळे अष्टविनायक मित्र मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, बालेवाडी येथील अमोल बालवडकर यांच्या मंडळाला रावसाहेब दानवे पाटील यांनी भेट देऊन गणरायाची आरती केल्याने या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीकडे स्थानिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.
याप्रसंगी माजी डीवायएसपी गणपतराव माडगूळकर, उद्योजक प्रभाकरजी पाडाळे, माजी सरपंच श्रीकांतजी जाधव, राधेश्याम शिंदे तसेच अष्टविनायक मित्र मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रावसाहेब दानवे पाटील यांनी यावेळी बालेवाडी व बावधन परिसरातील विविध गणेश मंडळांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले आणि आरती केली.















