आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून अभय छाजेड यांची MPSC विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला भेट; आंदोलनाला दिला पाठिंबा

पुणे : प्रकृती अस्वस्थ असल्याने गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड यांनी आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून येत MPSC विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा दर्शविला.

MPSC विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या सत्याग्रहाला राजकीय नेत्यांकडून पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अभय छाजेड यांनी प्रतिकूल प्रकृती असतानाही आंदोलनस्थळी उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी आपली भूमिका मांडत त्यांच्या लढ्याला पाठबळ दिले.

यावेळी आमदार रोहित पवार यांनी अभय छाजेड यांची भेट घेतली. प्रकृती ठीक नसतानाही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी दाखविलेली उपस्थिती आंदोलनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. दरम्यान, MPSC विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहातून भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असून, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.

See also  मुकुंद किर्दत, आप राज्य प्रवक्ते यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निकाला संदर्भातील प्रतिक्रिया