औंध गोपीनाथ मुंडे सभागृहात 12 वा जागतिक योग दिन उत्साहात साजरा

पुणे, प्रतिनिधी : जागतिक योग दिनानिमित्त औंध येथील स्व. गोपीनाथ मुंडे सभागृहात 12 वा जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ॲड. डॉ. मधुकर मुसळे व माजी नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांनी भारतीय योग संस्थेच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योग दिन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने योगसाधक आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना ॲड. डॉ. मधुकर मुसळे म्हणाले की, ऋषी-मुनी, संत-महंत यांच्या हजारो वर्षांच्या तपश्चर्या आणि परिश्रमातून विकसित झालेली भारतीय योग परंपरा आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे. योगाचा जागतिक स्तरावर वाढता स्वीकार ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास भारतीय योग संस्थेच्या श्रीमती भावना जमतानी, श्रीमती वीणा मनेरिकर, श्रीमती जानवी कदम, अनुराधा लढ्ढा, श्रीमती माधवी पानसरे, श्री प्रशांत शितुत, श्री प्रकाश कुलकर्णी, संगीता शिर्के, रमेश काळे, श्री व श्रीमती नायडू, श्री व श्रीमती दाभोळकर यांच्यासह अनेक योगसाधक उपस्थित होते.

योगाभ्यास, प्राणायाम आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. उपस्थितांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता केली.

See also  'ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान