मैत्री युवा प्रतिष्ठानकडून १० हजारांहून अधिक वारकऱ्यांना १ टन मोफत कांदेपोहे वाटप

पुणे : सामाजिक बांधिलकी जपत मैत्री युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने रविवार, १९ जुलै रोजी पहाटे ५ वाजल्यापासून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सुमारे १० हजारांहून अधिक वारकऱ्यांना १ टन मोफत कांदेपोहे (नाश्ता) वाटप करण्यात आले. हा सेवा उपक्रम पालखी मार्गावरील बरड (ता. फलटण) येथे उत्साहात पार पडला.

मैत्री युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मागील सलग १५ वर्षांपासून अविरत सुरू आहे. प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सभासद आणि मित्रमंडळी दरवर्षी पुण्यातून आवश्यक किराणा साहित्य व इतर साहित्य घेऊन जाऊन स्वखर्चाने आणि सेवाभावी वृत्तीने नाश्ता तयार करून वारकऱ्यांची सेवा करतात.

या उपक्रमासाठी बरड (ता. फलटण) येथील संतोष काशिद यांनी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच शेजारील गावातील सुनिल नाळे व त्यांच्या बंधूंनीही मोलाचे सहकार्य केले.

या सेवा उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मैत्री युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सभासद आणि मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. वारकऱ्यांनीही या सेवाभावी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

See also  माय माऊली केअर सेंटरमध्ये मोफत आरोग्य शिबिर