जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व

बाणेर : बाणेर येथील श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या 14 वर्षाखालील मुले व मुली यांनी अंतिम सामना जिंकून घवघवीत यश संपादन केले 14 वर्षाखालील मुलींनी सामना दिल्ली पब्लिक स्कूल या शाळेबरोबर २-० जिंकला. सई आगवणे, अनुषा सुजान, दर्शना माळी, या विद्यार्थिनींचा यामध्ये सहभाग होता.


14 वर्षे खालील मुलांचा सामना सिम्बॉयसिस शाळेविरुद्ध २–० जिंकला. कपिल जगदाळे, अनय जैन राघवेंद्र यादव रणवीर बोडके, यांनी अंतिम सामना जिंकला. याकरिता संस्थेचे संस्थापक श्री शिवलाल धनकुडे, अध्यक्ष सुरेखा धनकुडे, सचिव विराज धनकुडे, खजिनदार राहुल धनकडे, सीईओ ऍडव्होकेट सुषमा भोसले, प्राचार्य रेखा काळे, शारीरिक शिक्षक सौरभ पारिक तसेच सचिन डावकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

See also  विद्यार्थींनी केले ज्येष्ठांच्या सहवासात नविन वर्षाचे स्वागत