आता गणपती बाप्पा पण करणार मतदान; महाळुंगे मध्ये सूर्यमुखी गणेश मंदिराचे मतदार यादीत नाव

पुणे : मुळशी तालुक्यातील महाळुंगे गावांमध्ये सूर्यमुखी मंदिर झाला देखील मतदानाचा अधिकार निवडणूक मतदार यादी मध्ये नाव आल्याने मिळाला आहे. यामुळे या गणेश मंदिरातील गणपतीला देखील मतदानाचा अधिकार निवडणूक आयोगाने दिला असल्याची चर्चा आहे.

बारामती मतदार संघातील विधानसभा मतदार संघ भोर मधील महाळुंगे गावामध्ये यादी भाग क्रमांक 105 मध्ये 240 क्रमांकावर सूर्यमुखी मंदिर असे मतदाराचे नाव असून वडिलांचे नाव गणेश मंदिर असे छापण्यात आले आहे.‌ गणपती देवता असल्याने त्यांचा वास सर्वत्र असतो असा निवडणूक आयोगाचा समज असावा म्हणून घराचा पत्ता टाकण्यात आलेला नाही.

बारामती मतदार संघामधील निवडणूक ही चुरशीची मानली जात आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखा नुसार बारामती मतदारसंघाची निवडणूक ही अगोदर होणार असून नंतर पुणे शिरूर व मावळ मतदार संघाची निवडणूक होणार आहे. मुळशी तालुक्यातील शहरा लगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंद आढळून येत असून यावर कारवाईची मागणी सातत्याने होत असताना देखील दुर्लक्ष केले जात आहे.

See also  पुणे शहरात विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ