पै.शिवराज अनिल बालवडकर यांने रशिया येथील स्पर्धेत ब्रांझ पदक पटकावल्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

बालेवाडी : बालेवाडी येथील धर्मवीर आखाड्याचे पैलवान शिवराज अनिल बालवडकर यांनी नुकतेच रशिया येथील स्पर्धेत ब्रांझ पदक पटकावले , त्या निमित्ताने श्री शिवराज मित्र मंडळ , धर्मवीर आखाडा व समस्त ग्रामस्थांच्या वतीने पैलवान शिवराज ,बालवडकर यांचा सन्मान करण्यात आला..
बालेवाडी गावातील जुन्या पिढीतील पैलवान मंडळी तसेच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. मिरवणुकीची सुरुवात ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन झाली , आणि समाप्ती बालेवाडी चौकात झाली.
त्यानंतर पैलवान शिवराज बालवडकर व 80 किलो वजन गटातील ब्रांझ पदक विजेते पैलवान शंतनू गाढवे याचाही सन्मान करण्यात आला . सर्व मान्यवरांनी दोघांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या कौतुक सोहळ्याला सर्वपक्षीय स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. ह.भ. प. निवृत्ती महाराज बोरकर यांच्या हस्ते व माजी नगरसेवक अमोल बालवडकर , राहुल बालवडकर, लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर , स्वाभिमानीचे प्रकाश तात्या बालवडकर , वस्ताद दत्तात्रय बालवडकर वस्ताद समीर कोळेकर, आत्माराम बालवडकर, पै. दिनकर बालवडकर, पोलीस निरीक्षक किरण बालवडकर , सुरेशराव खांदवे पाटील, राजेश बालवडकर , शांताराम भोंडवे यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
रोनक गोटे यांनी सूत्रसंचालन केले तसेच परिवाराच्या वतीने भूमाता कृषी मंच पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल बालवडकर यांनी आभार व्यक्त केले.

See also  सोनम वांगचुक यांचे लडाखयेथे चालू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाषाण मध्ये आंदोलन