विधानसभा अध्यक्षांनी कोर्टाने सोपवलेला अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा – खासदार शरद पवार यांची मागणी

मुंबई : सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी कोर्टाने अध्यक्षांकडे सोपवलेला अपात्रतेचा निर्णय याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात विधिमंडळ पक्ष मान्य नसून जो राजकीय पक्ष आहे. त्याचा आदेश अत्यंत महत्वाचा आहे. काही निर्णय अद्याप व्हायचे आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेचा विषय सोपवण्यात आला आहे. हा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी सुप्रीम कोर्टोची अपेक्षा असल्याचं शरद पवार यांनी सांगितले.

खासदार शरद पवार म्हणाले,विधानसभा अध्यक्ष त्यांची भूमिका घेतील तेव्हा त्यांच्यासमोर आमचे म्हणणे मांडण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष हे इन्स्टिट्युशनल पद आहे. या पदाची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांनी या पदाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घ्यायला हवी. अपेक्षा आहे. इन्स्टिट्युशनसंबंधी या लोकांमध्ये किती आस्था आहे. हे उद्या त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होईल. 

माझ्या पुस्तकात मी याबाबत स्पष्टपणे लिखान केल्याने आमचे मित्र नाराजही झाले. पण त्यामागे नाराज करण्याचा हेतू नव्हता तर ती वस्तूस्थिती होती. सुप्रीम कोर्टाने तीच गोष्ट व्यक्त केली. मात्र झाल्या त्या गोष्टी झाल्या. आता आम्ही उद्धव ठाकरे, काॅग्रेस मिळून जोमाने काम करायला सुरूवात करू असे शरद पवारांनी सांगितले.

See also  योगीराज पतसंस्थेचेअनुकरण इतर पतसंस्थांनी करावे - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील