पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात 373 उमेदवारांची प्राथमिक स्तरावर निवड

पुणे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बानाई संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा कार्यक्रमात 373 उमेदवारांची उद्योजकांनी प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग, कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील उद्योजकांशी समन्वय साधून बेरोजगार उमेदवारांना रोजगारांची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये 3 हजार 350 रिक्त पदांच्या भरतीसाठी 38 उद्योजकांनी सहभाग नोंदविला. या मेळाव्यामध्ये 535 उमेदवारांची नोंदणी झाली असून यापैकी सुमारे 373 बेरोजगार उमेदवारांची उद्योजकांनी प्राथमिक स्तरावर निवड केली.

See also  अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न