औंध कुस्ती केंद्रात आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी केला पारंपरिक कुस्ती सराव ; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या मल्लांसोबत घेतला व्यायामाचा अनुभव

पुणे : औंध येथील पेशवेकालीन ऐतिहासिक तालमीचा वारसा जपणाऱ्या औंध कुस्ती केंद्राला छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांनी भेट देत पारंपरिक व्यायाम व कुस्तीचा सराव केला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळविणाऱ्या मल्लांसोबत तालमीत व्यायाम करून कुस्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

औंध कुस्ती केंद्राला कुस्तीची मोठी परंपरा असून, या तालमीतून अनेक नामांकित मल्ल घडले आहेत. या पारंपरिक क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मल्लांसोबत संवाद साधत त्यांच्या सरावाची माहिती घेतली.

यावेळी वस्ताद विकास रानवडे, पी.डी.सी.चे अध्यक्ष मनीषदादा रानवडे, कुमार भारत केसरी पै. विराज रानवडे, उद्योजक अभिजीत गायकवाड, राहुल गायकवाड, विलासराव रानवडे, औंध क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त गोविंद दांगट, निलेश गायकवाड, पै. दिलीप रानवडे, आनंदा कांबळे, प्रशांत शिर्के, सागर शिंदे, निलेश रावत, नितीन पगारे, अजित साठे, कृष्णा साबळे तसेच राष्ट्रीय स्तरावरील पदकविजेते अनेक पैलवान उपस्थित होते.

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या या सहभागामुळे पारंपरिक कुस्ती आणि व्यायामशाळांच्या माध्यमातून तरुणांमध्ये व्यायाम व क्रीडा संस्कृती वाढीस लागण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी भावना उपस्थित मल्लांनी व्यक्त केली.

See also  राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस