औंध कुस्ती केंद्रातील विराज रानवडे याची स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई

पुणे : औंध कुस्ती केंद्र येथील पैलवान विराज विकास रानवडे याने स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उदगीर येथे  ८७ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा कल्याण सेवा संचनालय आयोजित स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये औंध गाव तालीम संघ येथे सराव करणाऱ्या विराज विकास रानवडे याने 87 किलो वजनी गटामध्ये चितपट कुस्ती करत सुवर्णपदक मिळवले. वस्ताद विकास रानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत असून औंध गाव तालीम संघाच्या वतीने औंधगाव तालीम संघ अध्यक्ष विकास रानवडे, संचालक केदार कदम, मनीष रानवडे, विकास जुनवणे, यांनी अभिनंदन करण्यात केले.

See also  जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन च्या वतीने बाणेर पोलीस वाहतूक शाखेला प्रिंटर भेट