प्रभाग ८ व ९ मधील मुख्य रस्त्यांवरील खड्डे अखेर बुजविले ; बाणेर-बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी व औंध परिसरातील रस्त्यांना दिलासा; वाहतूक कोंडी व अपघात कमी होण्यास मदत
पुणे : प्रभाग क्रमांक ८ व ९ मधील १२ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती महापालिका पथ विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी आणि औंध परिसरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महापालिकेचे मुख्य अभियंता, पथ विभाग राजेश बनकर यांच्या आदेशानुसार, अधीक्षक अभियंता आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे यांच्या देखरेखीखाली ही खड्डे दुरुस्तीची कामे करण्यात आली. उपअभियंता प्रदीप रंगदळे यांच्या सहकार्याने शाखा अभियंता संदीप चाबुकस्वार, इलियाज शेख आणि शिवानंद पाटील यांनी पथ विभागाने निश्चित केलेल्या SOPनुसार रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती पूर्ण केली.पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने बाणेर-बालेवाडी तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होत होती. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी खड्डे अपघातांना कारणीभूत ठरण्याची शक्यताही निर्माण झाली होती.
पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने बाणेर-बालेवाडी तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होत होती. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी खड्डे अपघातांना कारणीभूत ठरण्याची शक्यताही निर्माण झाली होती.आता प्रमुख रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार असून, वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे किरकोळ तसेच गंभीर अपघात कमी होण्यासही या उपाययोजनेचा फायदा होणार आहे.
आता प्रमुख रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार असून, वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे किरकोळ तसेच गंभीर अपघात कमी होण्यासही या उपाययोजनेचा फायदा होणार आहे.महापालिका प्रशासनाने यापुढेही रस्त्यांची नियमित पाहणी करून नव्याने निर्माण होणारे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
महापालिका प्रशासनाने यापुढेही रस्त्यांची नियमित पाहणी करून नव्याने निर्माण होणारे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.