पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला बालवेडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

बालेवाडी : दसरा चौक, बालवेडी येथे राहुलदादा बालवडकर यांच्या माध्यमातून गेल्या ३ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश विसर्जन तलावाची निर्मिती करण्यात येत आहे. याही वर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

यावर्षी जवळपास ४,००० गणेशमूर्तींचे विसर्जन या विसर्जन तलावात करण्यात आले. यामध्ये घरगुती गणपती, विविध गणेश मंडळे तसेच सोसायट्यांमधील गणपतींचा समावेश होता.

नदी, नाले आणि नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळून भक्तिभावाने गणेश विसर्जन करता यावे, तसेच “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा पर्यावरणपूरक विसर्जनाची वाढती जाणीव आणि सामाजिक सहभागाचे प्रतीक आहे.

See also  औद्योगिक उत्कर्षाकडे महाराष्ट्राची यशस्वी वाटचाल – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन