बाणेर : इन्फोसेप्ट फाउंडेशन च्या वतीने बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन आणि पुणे महिला मंडळ (बाणेर – बालेवाडी विभाग) यांचे सहकार्याने बालेवाडी पोलीस चौकी ला १५ बॅरिकेड्स भेट देण्यात आले. ह्या बॅरिकेड्स चा उपयोग परीसरातील सुरक्षा व्यवस्था राखण्यात नक्की होईल असा विश्वास एपीआय राजकुमार केंद्रे यांनी व्यक्त केला तसेच बाणेर बालेवाडी भागातील कंपन्या नागरिक संस्था पोलिसांना मदत करण्यात पुढाकार घेत आल्याबाबत समाधान व्यक्त केले.
इन्फोसेप्ट फाउंडेशन च्या वतीने स्मिता दुबे, बालेवाडी फेडरेशन च्या वतीने अमेय जगताप तर महिला मंडळाच्या वतीने अस्मिता करंदीकर यांनी मनोगत व्यक्त केले, फेडरेशन चे अध्यक्ष रमेश रोकडे यांनी आभार मानले. या वेळी इन्फोसेप्ट चे प्रतीक कुमार, सुनील नरवरे, धनंजय जोशी, कनन अय्यर, शुभम पावसे, हर्षल भोयर उपस्थित होते तर फेडरेशन चे उपाध्यक्ष परशुराम तारे, सचिव एस. ओ. माशाळकर, अशोक नवाल, विकास कामत, मोरेश्वर बालवाडकर, डी. डी सिंग, आशिष कोटमकर, सुधीर निखारे, शकील सालती, भरत श्रीवास्तव, तर महिला मंडळाच्या कमल कोतवाल, जयश्री बेंद्रे सुप्रिया करमरकर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.
घर ताज्या बातम्या बालेवाडी पोलीस चौकी ला १५ बॅरिकेड्स भेट – इन्फोसेप्ट फाउंडेशन, बालेवाडी वेल्फेअर...