बाणेर मध्ये ‘ग्रे स्टोन’ इमारतीच्या बांधकामावरील क्रेन घरावर पडून अपघात

बाणेर : बाणेर येथील सर्वे नंबर 114 मधील ‘ग्रे स्टोन’ इमारतीच्या बांधकामावरील क्रेन घरावर पडून अपघात झाला सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. परंतु घरामध्ये असलेली दोन लहान मुले व महिला या भयभीत झाल्या होत्या तर यातील एक महिला ही बेशुद्ध पडली होती.

इमारतीच्या नव्या मजल्यावरती क्रेनच्या सहाय्याने काचा बसवण्याचे काम सुरू होते. दुपारी साडेचार च्या दरम्यान अचानक क्रेन नव्या मजल्यावरून खाली असलेल्या सायकर यांच्या घरावर पडली. यावेळी क्रेन पडल्यामुळे मोठा आवाज झाला. आवाजामुळे घरातील लहान मुले व महिला घाबरून बाहेर पडल्या. दरम्यान अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे एक महिला बेशुद्ध झाली होती.

इमारतीचे काम सुरू असताना वारंवार अशा प्रकारे सळई वस्तू घरांवर पडण्याचे प्रकार घडले आहेत. परंतु यावेळी संपूर्ण क्रेनच पडल्यामुळे येथे राहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बांधकाम करत असताना सुरक्षा नियमांचे योग्य पालन करण्यात आले नाही. योग्य काळजी घेण्यात न आल्याने सदर अपघात झाला असून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची भरपाई मिळावी तसेच बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन:नेत्र रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरतील-पालकमंत्री