पुणे : जागतिक हृदय दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग, Revive Heart Foundation व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी CPR प्रशिक्षण व प्रात्यक्षिक मॉकड्रिल आयोजित करण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला तातडीने CPR देण्याची पद्धत, प्राथमिक उपचार आणि वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे महत्त्व याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे CPR करण्याची योग्य पद्धत समजावून सांगण्यात आली.
या कार्यक्रमास पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर तसेच नॅशनल कोऑर्डिनेटर Revive Heart Foundation डॉ. किंजल गोयल, हृदयरोग तज्ज्ञ व Revive Heart Foundation रिजनल कोऑर्डिनेटर डॉ. जगदीश हिरेमठ, Revive Heart Foundation पुणे कोऑर्डिनेटर श्री. भीमाशंकर, रोटरी क्लबच्या दीपा भागवत आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.















