पदवीधर मतदारसंघात संधी कोणाला?

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली; शहर की ग्रामीण भागातील चेहऱ्याला संधी, याकडे लक्ष
पुणे : विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारीसाठी इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीतील जागावाटप आणि उमेदवाराच्या निवडीबाबत अंतिम निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ताज्या माहितीनुसार महायुतीतील जागावाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.भाजपकडून या मतदारसंघासाठी पुणे शहरासह ग्रामीण भागातील अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असल्याने पक्ष कोणाला संधी देणार, याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश होतो.

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याच मतदारसंघातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यामुळे या मतदारसंघाशी भाजपचे जुने राजकीय संबंधही चर्चेत आहेत.

भाजपकडून या मतदारसंघासाठी पुणे शहरासह ग्रामीण भागातील अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असल्याने पक्ष कोणाला संधी देणार, याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश होतो.

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याच मतदारसंघातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यामुळे या मतदारसंघाशी भाजपचे जुने राजकीय संबंधही चर्चेत आहेत.

दरम्यान, मतदार नोंदणीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू आहे. अधिकृत उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

See also  स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूल मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला "संविधानाचे दीपस्तंभ" नाटक सादरीकरण