मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पासपोर्ट कार्यालय जवळ पाषाण येथे बेमुदत आंदोलन सुरू

पाषाण : लोकशाहीचा अपमान करणाऱ्या आणि संविधानावर घाला घालणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आज दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजल्यापासून बाणेर, पाषाण लिंक रोड, नवीन पासपोर्ट ऑफिस जवळ, पुणे येथे बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व समीर सुमन बबन उत्तरकर  आणि ॲड. कीर्ती रामदास काळे हे करत आहेत. 

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या:ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा:  ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा द्यावा.SIR प्रक्रिया रद्द करणे: वादात सापडलेली SIR प्रक्रिया तातडीने रद्द करावी.कमी केलेली नावे पुन्हा जोडणे: SIR प्रक्रियेत चुकीच्या पद्धतीने कमी केलेली मतदारांची नावे पुन्हा मतदारयादीत जोडण्यात यावीत.कठोर कारवाई: ज्ञानेश कुमार यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.बॅलेट पेपरवर निवडणुका: ईव्हीएम (EVM) प्रणाली पूर्णपणे रद्द करून आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्यात याव्यात.

“लोकशाही टिकवण्यासाठी सरकारच्या विरोधात असणे म्हणजे राष्ट्राच्या विरोधात असणे नव्हे,” असा संदेश देत आंदोलकांनी संविधानाच्या रक्षणासाठी हा लढा पुकारला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत आणि राजीनामा होत नाही, तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

See also  पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील