बालेवाडी येथे संविधान चषक स्पर्धेचे आयोजन

बालेवाडी : राहुल दादा बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन व न्यू घातक स्पोर्ट्स क्लब भीमनगर, बालेवाडी यांच्यावतीने संविधान चषक 2023 या भव्य टेनिस बॉल हाफ पीच नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


दि. 26 एप्रिल ते 1 मे 2023 या दरम्यान संपन्न होणाऱ्या ह्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.त्यामध्ये ७० संघानी सहभाग घेतल आहे.

त्यावेळी माजी‌ सरपंच अंकुश बालवडकर,पै.दिनकर आप्पा बालवडकर,राष्ट्रवादीचे युवा नेते राहुल बालवडकर, मनोज बालवडकर, संदीप बालवडकर,दत्तात्रय बालवडकर,आनंदा कांबळे,किरण धेंडे,ॲड.तुषार बालवडकर,नवनाथ बालवडकर,किरण बालवडकर,सागर बालवडकर,राहुल बालवडकर व विशाल बालवडकर उपस्थित होते. ही स्पर्धा बालेवाडी स्मशानभूमी जवळील मैदान,भीमनगर,बालेवाडी या ठिकाणी सामने खेळवले जाणार आहे.

See also  बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल-राज्यपाल रमेश बैस