खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने माती कलेच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन

पुणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने हातकागद संस्था शिवाजीनगर येथे १ ते ३ मे दरम्यान मातीकला वस्तूंचे राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवार १ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा, खादी आयोगाचे राज्य संचालक योगेश भामरे, उद्योजक श्रीकांत बडवे उपस्थित राहणार आहेत.

या व्यवसायातील कारागिरांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनात सुमारे तीस स्टॉल असणार आहेत. कुंभारी पारंपरिक भांडी, माठ ते अत्याधुनिक अशा विविध कलात्मक वस्तूंचा समावेश असणार आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दु.क्र.०२०-२९७०१८३८ वर संपर्क साधावा. या प्रदर्शनाला अधिकाधिक नागरिकांनी भेट द्यावे, असे आवाहन सभापती रवींद्र साठे यांनी केले आहे.

See also  टेनिक्वाईट (रिंग टेनिस) जागतिक स्पर्धा प्रशिक्षण शिबीरामध्ये पुण्याचे प्रथमेश ढवळे, साहिल खेडेकर, प्रणव पाटील आणि सिध्दि जाधव यांची निवड