सत्ता आणि पैशाची मस्ती करू नका भाजप नेत्याचा सल्ला

विशेष प्रतिनिधी
पुणे : सत्ता आणि पैसा याची मस्ती दाखवत जनतेसमोर फिरू नका, असे भाजप लोकप्रतिनिधींना सांगण्याची वेळ भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल.संतोष यांच्यावर आली.

राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल.संतोष हे संघ आणि भाजप यांच्यातील समन्वयक आहेत. त्यांच्यावर हा सल्ला देण्याची वेळ आली, हे राजकीय वर्तुळात महत्त्वाचे मानले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत वाराणसी, नागपूर आणि पुणे येथे पक्षाचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर बी.एल.संतोष आदी नेत्यांनी या पराभवाबद्दल मौन पाळले असले, तरी ‘मस्ती नको’, असे सांगून आत्मचिंतन केलेले आहे. महागडे मोबाईल वापरायचे, अलिशान गाड्यांमधून फिरायचे असे करू नका, असे बी.एल.संतोष यांनी सांगितले.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. खासदार, आमदार निवडीत लक्ष घालणाऱ्या बी.एल.संतोष यांचा सल्ला भाजपचे लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेतील का?

पुणे शहराच्या पाणी वाटपासाठी कालवा समितीची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीला भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ उपस्थित नव्हते. ते दोघेजण बी.एल.संतोष यांच्या स्वागत आणि बैठकीत गुंतले होते, असे समजते.

See also  प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुखकर होईल - अजय देशपांडे