कोथरूड : लोकप्रतिनिधी म्हंटल्यावर स्वभाविकपणे नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना सामोरे जाणे आणि त्या सोडविण्याची मोठी जबाबदारी नगरसेवकांची असते,हे कठीण काम नगरसेवकांना करावे लागते असे केंद्रीय नागरी उड्डाण व सहकारिता राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ म्हणाले. मी स्वतः त्यातून गेलोय त्यामुळे हे किती अवघड असते मला हे माहिती आहे असेही ते म्हणाले.मात्र कुठे ही काम करताना वास्तूला फार महत्त्व असते,आपल्याला त्यातूनच सकारात्मक ऊर्जा मिळते आणि अधिक चांगलं काम करता येते, प्रभाग समितीच्या अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांनी अतिशय सुंदर असे सभागृह व कार्यालयाचे नूतनीकरण केले असून सर्वच नगरसेवक येथून अधिक चांगलं काम करतील असा विश्वास ही नामदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,अतिरिक्त आयुक्त विशेष ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त विजय थोरात, सहाय्यक आयुक्त श्रीमती अस्मिता तांबे,नगरसेवक पुनीत जोशी, स्वप्नील दुधाणे, सुनील पांडे, भारतभूषण बराटे, नगरसेविका मिताली सावळेकर,रेश्माताई बराटे,तेजश्री पवळे, हर्षदा भोसले, माजी नगरसेवक दीपक पोटे इ मान्यवर उपस्थित होते.
गत बारा वर्षात ह्या सभागृहाचे नूतनीकरण झाले नव्हते, मी २०१७ साली पहिल्यांदा निवडून आले तेव्हापासूनच हे सभागृह व कार्यालय अद्यावत करावे अशी माझी इच्छा होती व ते आता २०२६ मध्ये पक्षाने संधी दिली व मला प्रभाग समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यावर मी पूर्ण केली याचे समाधान आहे असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. ह्या कार्यालयातून आम्ही सर्व नगरसेवक नागरिकांना अपेक्षित कार्य करू असा विश्वास व्यक्त करतानाच ” निवडून आल्यापासून कोणती ना कोणती आचारसंहिता, एस आय आर चे काम यात प्रशासन व्यस्त होते व आम्हाला ही बंधन होते, त्यामुळे नागरिकांना अपेक्षित विकास कामं दिसत नव्हती, मात्र आता कामांना वेग येईल असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
कार्यक्रमाला ऍड. प्राची बगाटे, संतोष लांडे,वैभव जमदाडे, बाळासाहेब धनवे,राजेंद्र येडे,शंतनू खिलारे,विवेक विप्रदास,श्रीकांत गावडे, अनघा जगताप,गायत्री लांडे, मानसी ठाकूर,छाया सोनावणे,पूनम चव्हाण,संगीता शेवडे,मालन सरोदे, कविता सदाशिवे,रुपाली मगर, मोहल्ला कमिटी चे सदस्य, स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















