नांदेगाव येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा

मुळशी :जिल्हा परिषद शाळा नांदे येथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया परिपूर्ण व्हावा यासाठी पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला.

त्यावेळी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांच्या आवडीच्या रंगांमध्ये हात बुडवून त्यांच्या हाताचा ठसा उमटवून घेण्यात आला. मुलांची पूर्वतयारी व पाया कसा भक्कम करून घ्यायला घेण्यात यावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापका भंडारी मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

नांदेगावच्या सरपंच निकीता चंद्रशेखर रानवडे पाटील यांनीही मुलांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण समितीचे उपाध्यक्ष सागर जाधव, दिपाली जोगदंड उपस्थित होते.

See also  बाणेर येथील बांधकाम व्यवसायिकाच्या हलगर्जीपणामुळे नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू