भारतीय संविधान दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्त गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे महानगरपालिका भवनासमोरील हिरवळ मैदान येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूलभूत मूल्यांचे यावेळी स्मरण करण्यात आले. तसेच संविधानातील ही मूल्ये दैनंदिन जीवनात आणि प्रशासकीय कामकाजात अंगीकारून लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

या कार्यक्रमास महापौर मंजुषा दीपक नागपुरे,  उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, गटनेते श्री. सोपानकाका चव्हाण यांच्यासह पुणे महानगरपालिकेचे सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षारक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘विश्व नवकार महामंत्र दिवसाचे आयोजन’; विश्वकल्याणासाठी नवसुत्री अंगीकारण्याचे प्रधानमंत्र्यांचे आवाहन