शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा

पुणे : शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवार आता कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर निवृत्त होणार, असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. यापुढे तीनच वर्षे राजकारणात राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणानंतर राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते भाऊक झाले होते. अनेकांनी या घोषणेला सभागृहातच विरोध दर्शवला. राष्ट्रवादीच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी यावेळी स्टेजवर जाऊन पवार साहेबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येईल. ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शरद पवार म्हणाले, पहिल्यांदा लोकांना वाचायला शिकलं पाहिजे, व्यक्ती वाचन हे तुमच्या सर्वांच्या ज्ञानात भर टाकणार असेल. माझे वडील बंधू आप्पासाहेब पवार नगरच्या प्रवरा साखर कारखाण्यात कृषी अधिकारी होते. त्यांनी मला नगरला बोलावून रयत शिक्षण संस्थेसोबत काम करण्यास सांगितलं. १ मे १९६० रोजी माझी सार्वजनिक ६३ वर्षे पूर्ण झाली. त्यातील ५८ वर्षे मी राजकारणात राहिलो यानंतर आता केवळ तीन वर्षे राहिली आहेत.

See also  बालेवाडी दसरा चौक ते कुणाल एस्पायरी रस्त्याचे डांबरीकरण सुरु