विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व आमदारांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सकाळी भेट घेतल्यानंतर, विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी सपत्नीक व आमदारांसह महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांच्यासोबत विक्रमगडचे (पालघर) आमदार सुनील भुसारा व इगतपुरी (नाशिक) आमदार हिरामण खोसकर होते. यावेळी परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

श्री. झिरवाळ म्हणाले की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना करून महत्त्वपूर्ण कार्य केले. श्री. चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या या कार्यालयाचे महत्त्व आजही कायम आहे. या केंद्राच्या माध्यमातून राजधानीत महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम राबविणे, संस्कृतीचे संवर्धन करणे आदी महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. नवमाध्यमांच्या युगात परिचय केंद्रही आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे कार्य उत्तम प्रकारे करीत असल्याचे पाहून त्यांनी या उपक्रमांचे कौतुक केले.

See also  काॅंग्रेसच्या बालेकिल्ल्यात नांदेडमध्ये अमित शहा यांची जाहीर सभा, काहीही होणार नाही, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया