डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्यविषयक योजना सुरु करण्यासाठी पतित पावन आक्रमक

पुणे : पुणे महानगरपालिकेद्वारा संचलित डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्य योजना पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती . मागील वर्षभरात तब्बल 47 हजार हुन अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. परंतु निधी नसल्याचा कारण देत या अर्थसंकल्पात निधी न देता हि आरोग्यविषयक योजना बंद करून पुणेकर नागरिकांच्या आरोग्य वेठीस धरण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनामार्फत सुरु आहे .
कोरोना रुपी समस्येच घोंघावणारा वादळ आता कुठे कमी झालं असताना . संपूर्ण जगाला आरोग्यविषयक यंत्रणा सक्षम करण्याचा एवढा मोठा धडा दिलेला असताना देखील पुणेकरांच्या आरोग्याशी निगडित योजनेचा प्रशासकीय बळी दिला जातो हि शरमेची बाब आहे .
स्मार्ट सिटी आणि G20 साठी सर्वसामान्य पुणेकरांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी करणाऱ्या पालिकेला एक अत्यंत उपयुक्त आणि आरोग्याशी निगडित योजना निधी अभावी बंद पडत आहे . या योजनेचा बळी देताना आयुक्तांना जनाची नाहीतर मनाची लाज आहे का ? प्रश्न पतीत पावन संघटनेच्या वतीने उपस्थित केला आहे.
पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्य योजना आठवड्याभरात कार्यान्वित नाही झाली तर पालिका आयुक्तांना पतित पावन पुण्यात फिरू देणार नाही अशा प्रकारचा इशारा पालिका आयुक्तांना अजित पवार संघटनेच्या वतीने देण्यात आला यावेळी पतित पावन संघटना जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, कामगार महसंगाचे रवींद्र भांडवलकर,प्रसाद वाईकर,योगेश वाडेकर, यादव पुजारी,विजय क्षीरसागर, सौरभ पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

See also  लोकसभा सावत्रिक निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी