बाणेर-बालेवाडी योजनेचे १७ मे रोजी लोकार्पण करण्याच्या पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे :समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांचा पाण्याच्या सोडविण्यासाठी येत्या १७ मे रोजी योजनेचे पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीस पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, २४x७ योजनेचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच पाणी मोजणीसाठी मीटर लावावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

See also  शासकीय काम वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी मंत्रालय मध्यवर्ती टपाल स्वीकृती केंद्र – अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक