जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन

पुणे : पुणे येथे होणाऱ्या जी-२० ‘डिजिटल इकॉनॉमी’ कार्य गट बैठकीच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्यावतीने लोकसहभागासाठी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले.

‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा’ हा संदेश घेऊन आयोजित सायकल रॅलीचा शुभारंभ अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आला. सायकल फेरीमध्ये सुमारे २ हजार २०० नागरिक सहभागी झाले.

पुणे मनपा मुख्य भवन, मॉडर्न कॅफे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिवार वाडा मार्गे मनपा भवन येथे सायकल फेरीचा समारोप झाला. उत्साहाच्या वातावरणात विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांनी या सायकल फेरीत सहभाग घेतला. सहभागी सर्व सायकल स्वारांना पदक प्रदान करण्यात आले.

सायकल फेरीचे नेतृत्व पुणे मनपा सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशी यांनी केले. महिला गटाचे नेतृत्व नेहा भावसार यांनी केले.

यावेळी मनपा उपायुक्त चेतना केरुरे माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे , अधीक्षक अभियंता राजेंद्र तांबे, सुरक्षा अधिकारी राकेश विटकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांच्या माध्यमातून बाणेर येथे ॲमिनिटी स्पेसची स्वच्छता