मॉडर्न महाविद्यालय येथे महारोजगार मेळाव्याला १००० उमेदवारांची नोंदणी

पुणे : गणेशखिंड येथिल मॉर्डन कॉलेज येथे मेगा प्लेसमेंट ड्राइव्ह मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या मेळ्याचे उद्घाटन माननीय प्राचार्य डॉ. संजय खरात यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना प्राचार्य खरात म्हणाले,” महाविद्यालयात रोजगाराभिमुख शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांची कंपन्यामधे निवड व्हावी यासाठी हे प्रयत्न आहेत.आजच्या रोजगार मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अनेक विद्यार्थ्यांची प्राथमिक फेरीसाठी निवड झाली आहे.”

मेगा जॉब ड्राइव्हमध्ये 15 हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सुमारे ३० एचआरच्या मदतीने विप्रो, डब्ल्यूएनएस, आयसीआयसीआय बँक, प्रेसिजन, यशस्वी, एचडीएफसी, महालक्ष्मी, एक्सेला, कोटक महिंद्रा या सुप्रसिद्ध कंपन्या आणि मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या जवळपास १५ कंपन्यांनी विद्यार्थ्यांची नोंदणी केली आणि त्यांच्या मुलाखती घेतल्या.

यामध्ये एकूण 996 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी सुमारे 450 विद्यार्थी वॉक इन झाले असून 300 विद्यार्थ्यांची प्राथमिक फेरीसाठी निवड झाली आहे. हे सर्व उमेदवार पुणे परिसर, बारामती, शिरूर, नगर या ठिकाणचे होते.
या मेळाव्याचे समन्वयक डॉ. सतीश अंबिके व त्यांचे सहकारी श्री.निखिल पवार, श्री.शंकर जाधव, कु.शेरोन शहा, श्री.अनिकेत जमदाडे, श्री.भूषण कुदळे आणि कु.संपदा तिडाके आणि सर्व मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.
पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर, उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित या प्रसंगी उपस्थित होते.

See also  एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप फॉर टु-व्हिलर स्पर्धेचे १४ आणि १५ डिसेंबर रोजी आयोजन