मॉडर्न विधी महाविद्यालयात ३ रा राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय विधी रंग कार्यक्रम साजरा

पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न विधी महाविद्यालय, गणेशखिंड,येथे ३ री राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विधीरंग या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, समन्वयक अड.डॉ. चिंतामणी घाटे, प्राचार्या डॉ.अनन्या बिबवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.विधीरंग ह्या महोत्सवाच्या समारोपाच्या दिनी पारितोषिक वितरणासाठी 12 मे ला प्रदर्शित होणा-या रावरंभा या मराठी चित्रपटाचे प्रमुख अभिनेते ओम भुतकर, अभिनेत्री मोनालीसा बागल , सहकलाकार आदर्श जाधव, दिग्दर्शक अनुप जगदाळे व निर्माते शशिकांत पवार उपस्थित होते.


५ दिवसीय सुरू असलेल्या या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन महोत्सवामध्ये विविध महाविद्यालयातील अंदाजे 275 हुन अधिक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. ह्या महोत्सवामध्ये एकूण २९ स्पर्धा पार पडल्या विधीरंग ह्या महोत्सवाचे आयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले होते. विधिरंग हा महोत्सव ही विद्यार्थ्यांनसाठी उत्तम संधी आहे. ज्यामुळे विद्यार्थ्याना त्यांच्यातील विविध कला गुणांना वाव, प्रोत्साहन देण्याची संधी मिळते. अशा स्पर्धेतील सहभागामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होण्यास मदत होते. जिंकणे व पराभूत होणे हा स्पर्धेचा भाग असून त्यामधुन शिकणे व व्यक्तीमत्व विकास होणे हे महत्वाचे आहे असा सल्ला चित्रपटाचे दिगदर्शक अनुप जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
२०१९ पासून होणा-या या महोत्सवाचे पी.एन.जी. ब्रदर्स, लीपल्युर, जोशी सुगंधालय, अर्बन तडका, अर्बन स्क्रीन अड हेअर क्लिनिक, कॅफे युरोफिया, कॅफे डिलिसिशिओ, A.S.G फुड्स, कँडल व मिस्टिक विजन्स या वर्षीचे हे विविध उद्योजक प्रोयोजक होते.
स्पर्धेमध्ये मुंबई, नाशिक, बारामती, अकोला, पुणे येथून विविध महाविद्यालयामधून विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोदवला. विविध स्पर्धांमधून मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, निगडी ह्या महाविद्यालयास जनरल चँपियनशिपचे पारितोषिक देण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहा. प्रा. श्री. कोस्तुभ घाटे व सहा. प्रा. चिन्मय शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील उपप्राचार्या डॉ. शिवांजली भोईटे, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समन्वयक प्राचार्या

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शिवाजीनगर बसस्थानकाच्या कामांचा आढावा