वेदप्रकाश गुप्ता यांची ससून रुग्णालयास सक्षन मशीन आणि वॉटर कूलरची भेट

पुणे, दि. ६: मार्केट यार्ड येथील व्यापारी वेदप्रकाश गुप्ता यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित ससून रुग्णालयातील मज्जासंस्था विभागाकरीता सक्षन मशीन आणि वॉटर कूलरची भेट दिली.

यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, मानव सेवा ट्रस्टचे सी. आर. जैन, मज्जासंस्था विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जयकुमार गुंजकर, ससून रुग्णालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गणेश बडदरे, समाजसेवा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शंकर मुगावे, प्रशासकीय अधिकारी अनिल माने, समाजसेवा अधिक्षक प्रथमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी अधिष्ठाता डॉ. काळे म्हणाले, ससून रुग्णालयात समाजातील विविध घटकांतील गरजू रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे हे रुग्णालय गरीब व गरजू रुग्णांचे रुग्णालय म्हणून राज्यात ओळखले जाते. श्री. गुप्ता यांसारख्या दानशूर व्यक्तींकडून देण्यात येणाऱ्या विविध वैद्यकीय सामुग्रीमुळे ससून रुग्णालय अद्ययावत होत आहे. अशा वैद्यकीय सामुग्रीमुळे गरजू रूग्णांच्या विविध महागड्या तपासण्या तसेच निदान सवलतीच्या दरात होत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी ससून रुग्णालयास अशाचप्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. काळे यांनी केले.

See also  नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम