धनकवडी मध्ये छत्रपती शिवशंभू जन्मोत्सव समितीच्या वतीने छ.संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा

धनकवडी : श्री छत्रपती शिवशंभु जन्मोत्सव समिती धनकवडी गाव आयोजित धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या संख्येने उत्साहात थाटा माटात साजरा करण्यात आला.
सर्व नागरिकांनी पालखी मिरवणूक सोहळ्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मिरवणूक सामील होऊन पालखी मिरवणुकीची शोभा वाढवली.
एक गाव एक उत्सव अशी संकल्पना मनात ठेवून समितीने 72 गणेश मंडळ सर्व हिंदुत्ववादी संघटना , सर्व पक्षीय, सोसायटी , ग्रुप अश्या सर्वांना एकत्र करून पालखी मिरवणूक सोहळा पार पाडला.


या मिरवणुकीत संभाजी महाराजांची भव्यदिव्य 10 फुटी मूर्ती आकर्षण होती. पालखी सोबत आरती म्हणणारे संभळ वाले , हलगी पथक , शंखनाद ढोलताशा पथक , बँड व पालखी सोबत लायटिंग असलेल्या छत्री , लहान मुलांचा मर्दानी खेळ पथकाचा सामावेश पालखी मिरवणूकीत करण्यात आला होता.
पालखी मिरवणूकीची सुरुवात महिलांच्या हस्ते आरती करून करण्यात आली.

पालखी मिरवणूक ही चैतन्य नगर येथून धनकवडी बस स्टॉप ते पालखी मार्ग सावरकर चौक ते दत्तमंदिर शेवट जानुबाई मंदिर येथे देवीची आरती म्हणून मिरवणूक पार पाडली.

यावेळी धनकवडी परिसरातील विविध मंडळाचे सदस्य, समितीचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.

See also  चांगल्या कामाची पावती समाजातून मिळत असते - सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक