जलतरण तलावात क्रिकेट खेळून मनसेचे पालिके विरोधात केले हटके आंदोलन

औंध : छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेले जलतरण तलाव मा.आमदार शिवाजीराव भोसले (दळवी हॉस्पिटल जवळ), महाराज सयाजीराव गायकवाड भवन येथील औध जळतरण तलाव (औध ) या नावाने असलेले जलतरण तलाव बरेच दिवसापासून 7 वर्षे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या सोई सुविधा मिळत नाहीयेत अनाठायी जास्त पैसे खर्च करून खाजगी जलतरण तलावास जास्त पैसे भरावे लागतात त्यामुळे स्थ्यनिक नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी लवकरात लवकर जलतरण टाळा दुरुस्त करून नागरिकांना उपलब्ध करू द्यावे म्हूणन महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती शिवाजीनगर विभाग तर्फे बंद पडलेल्या औंध जलतरण तलावात स्विमिंग चे कपडे व पाण्याच्या ट्यूब वॉटरप्रूफ गॉगल घालून तलावात क्रिकेट खेळू हटके आंदोनल करत निषेध व्यक्त केला .

यावेळी प्रदेश सचिटणीस रणजित शिरोळे, मनसे विभागअधक्ष विनायक कोतकर,महिला विभाग अध्यक्ष जयश्री मोरे, जनाताई रणदिवे,निलेश जुनवणे, अनिकेत मुरकुटे, अमर आढाळगे, मयूर बोलाडे, जितेंद्र कांबळे, अनिल व्हाटकर, सुनील लॉयरे, चेतन धोत्रे, करणं सुरवसे,निलेश रणदिवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  जिल्ह्यात तीन लढती प्रादेशिक पक्षात