नृसिंह हायस्कूल सांगवी येथे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

सांगवी : नृसिंह हायस्कुल माजी विद्यार्थी सोशल फाउंडेशन यांच्या तर्फे आणि मथुराबाई वशिष्ठ रक्तपेढी, के. ई. एम. रुग्णालय, पुणे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे हे चौथे वर्ष असून दरवर्षी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ४ जून रोजी सकाळी १० ते सायं. ५ यावेळेत
नृसिंह हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, शितोळे नगर, सांगवी येथे रक्तदान करण्यासाठी माजी विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क – ९८८१४९९०२६, ९८९०९७५८९९

See also  संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायम कटिबद्ध : पृथ्वीराज चव्हाण