पुणे : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केल्यानंतर पुणे शहर शिवसेना,युवासेना आक्रमक झाली असून,संजय राऊतला वेड्याच्या इस्पितळात भरती करणार असल्याची तिखट प्रतिक्रिया प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली, ते शिवसेना,युवासेना आयोजित जोडे मारो आंदोलनात बोलत होते,
पुणे शहर शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या वतीने गुडलक चौक येथे संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी किरण साळी म्हणाले की ज्याप्रमाणे ते माईकवर थुंकलेत येणाऱ्या निवडणुकीत मतदार मतपेटीतून संजय राऊतच्या तोंडावर थुंकतील तसेच सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले म्हणाले कोणतेही काम नसलेल्या संजय राऊत यांच डोकं ठिकाणावर नसून माध्यमांनी त्यांना महत्त्व देऊ नये प्रत्येक वेळेस बेताल वक्तव्य करून ते महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरतात, आता हे सहन केल्या जाणार नाही.
यावेळी पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे,सह संपर्कप्रमुख अजय बापू भोसले,युवासेना राज्यसचिव किरण साळी, जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे,युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे,माथाडी जिल्हाप्रमुख निलेश माझीरे,शहर संघटक श्रीकांत पुजारी,महिला आघाडी अध्यक्षा लीनाताई पानसरे,महिला शहर प्रमुख पूजा रावेतकर,युवासेनेचे आकाश शिंदे,उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर,संजय डोंगरे, विकास भांबुरे,राजाभाऊ भिलारे,सचिन थोरात,नितीन लगस, गौरव साइनकर,महिला संघटिका श्रद्धा शिंदे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.