शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

पुणे :- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने जी-२० बाबत व्यापक प्रमाणात जनप्रबोधन करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ यावर आधारित एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे ९ जून २०२३ रोजी आझम कॅम्पस पुणे येथे आयोजन करण्यात आल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक शरद गोसावी यांनी कळविले आहे.

पुणे येथे १९ ते २२ जून दरम्यान होणाऱ्या जी-२० परिषदेत ‘बालकांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ हा विषय केंद्रस्थानी आहे. सन २०२६-२७ पर्यंत ९ वर्षापर्यंतच्या प्रत्येक बालकांमध्ये क्षमता वृद्धी होण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच महिला व बालविकास, समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, इतर मागास व बहुजन कल्याण या विभागातील प्रतिनिधींना तसेच स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील तज्ञांनाही या कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आलेअधिकाऱ्यांसाthi० परिषदेबाबत जनप्रबोधन करण्यासाठी १ ते १५ जून दरम्यान शिक्षण विभागामार्फत गाव पातळीपर्यंत उन्हाळी शिबीर, शैक्षणिक खेळ, पालक शिक्षक सभा, शाळा व्यवस्थापन समिती सभा, ग्रामसभा, सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गाऊया, गोष्टी रचूया, प्रश्नमंजुषा, काव्य, वाचन, गायन, वादन, एकांकिका, प्रभात फेरी, नाट्य स्पर्धा, पथनाट्य, घोषवाक्य स्पर्धा, चित्र काढणे रंगविणे, शाळा पूर्वतयारी मेळावे, शाळेतले पहिले पाऊल अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असेही शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर "तुतारी" पक्ष चिन्हाचे अनावरण