विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीचे सोमवारी आयोजन

पुणे :- पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवार १२ जून २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीत सभागृह क्र.१ येथे आयोजित करण्यात आली आहे, असे महसूल उपायुक्त तथा विभागीय भ्रष्टाचार समितीचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो.

See also  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे नियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विशेष सत्कार