पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदी मुरलीधर मोहळ, शिरूर लोकसभा मतदार संघाचे महेश लांडगे आणि बारामती लोकसभा मतदार संघाचे राहुल कुल

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदी मुरलीधर मोहळ, शिरूर लोकसभा मतदार संघाचे महेश लांडगे आणि बारामती लोकसभा मतदार संघाचे राहुल कुल यांची नियुक्ती भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

आगामी लोकसभांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या लोकसभेच्या मतदार संघांवर आपले तरुण नेतृत्व निवडणूक प्रमुख पदावर नियुक्त केले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्त्या केल्या असून मतदार संघांमध्ये लोकप्रियता असलेले तसेच सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणारे नेते भाजपाने लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुख पदी नियुक्त करून लोकसभा निवडणुका पूर्ण ताकतीने जिंकण्याचा निश्चय केल्याचे दिसत आहे.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सध्या भाजपाच्या राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी असून पुणे शहरांमध्ये कोरोना कालावधीमध्ये केलेल्या कामामुळे ते सर्व सामान्य नागरिकांना मध्ये लोकप्रिय ठरले होते. याचा फायदा भाजपाला पुणे शहरांमध्ये राजकीय बांधणी करण्यासाठी होणार आहे. तर आमदार महेश लांडगे हे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहेत.

See also  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा महाराष्ट्र सदन सावरकर जयंती निमित्त पुतळा हटविण्यात आल्या प्रकरणी कार्यवाहीची मागणी