राष्ट्रवादीचा हा अंतर्गत चित्रपट, सिनेमाचा एंड होत नाही तोपर्यंत काय प्रतिक्रिया द्यायची – देवेंद्र फडणवीस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या निवड समितीच्या बैठकीत शरद पवार यांची पक्षाच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव मांडण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट आहे. यात कलाकार देखील अंतर्गत आहेत, पटकथा देखील अंतर्गत आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एन्ड होत नाही. तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा यावर प्रतिक्रिया देऊ. पण हे सगळं स्क्रिप्टेड होतं असं मी म्हटलं नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

See also  जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस