आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी ! लहू बालवडकर सोशल वेल्फेअरचा उपक्रम

पुणे : –  संपूर्ण महाराष्ट्राच्या भक्तिभावाचा संस्कृतीचा, परंपरेचा मानबिंदू असलेला उत्सव म्हणजेच आषाढी वारी. या निमित्त सर्व वारकरी संप्रदाय व भाविक विठ्ठालाच्या नामस्मरणात एकरूप होतात. आषाढी वारीनिमित्त लहू बालवडकर सोशल वेल्फेअरच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबिवले जातात. यातच भाजपचे युवा नेते लहू बालवडकर यांच्या आजी श्रीमती भिकाबाई शंकर बालवडकर या गेल्या २५ वर्षापासून नित्य नियमाने पांडुरंगाच्या भेटीला जात असतात. या २५ वर्षाचं औचित्य साधून लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी रूग्णवाहिका देण्यात आली आहे. या रूग्णवाहिकेचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री तशा उच्च व तत्रंशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, युवा किर्तनकार ह.भ.पचैतन्य महाराज वाडेकर औदुंबर ग्रुप हरी भक्त वारकरी मंडळ व बाणेर,बालेवाडी,सुतारवाडी,पाषाण, सोमेश्वरवाडी,सुस,महांळुगे परिसरातील सर्व नागरीक माता भगिनी उपस्थित होते. 

लहू बालवडकर यांच्या मातोश्री श्रीमती भिकाबाई शंकर बालवडकर या गेल्या २५ वर्षापासून वारीला जात आहेत. पंरतु आता शाररीक वृद्धपकाळामुळे सध्या त्या जाऊ शकत नसल्याकारणाने तिच्या संकल्पनेतून दोन वर्षापुर्वी रूग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक वारीसाठी पाठविण्याचा निश्चय लहू बालवडकर सोशल वेल्फेअरने केला. त्याचप्रमाणे याही वर्षी लहू बालवडकर सोशल वेल्फेअरच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी रूग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक पंढरपुरपर्यंत अहोरात्र सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी संपुर्ण वारी दरम्यान मोफर वैद्यकीय आरोग्य तपासणी सेवा शिबीर वेल्फेअरच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा शिबीर लावण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपुर यादरम्यान ११ जून ते २७ जून या कालावधीत लहू बालवडकर सोशल वेल्फेअरच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा शिबीर लावण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा शिबीर लावून रोज १ ते २ हजार वारकरी माय माऊलींना मोफत तपासणी करून औषधोपचार केला जाणार आहे.

See also  दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त निम्हणमळा सिद्धिविनायक मंदिरामध्ये दीप महोत्सव